Urfi Javed New Look । मुंबई : अभिनेत्री उर्फी जावेद सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. उर्फी कधी काय करेल याचा अंदाज कोणीही लावू शकत नाही. उर्फी अनेकदा तिच्या अतरंगी फॅशनमुळे वादाच्या भोवऱ्यात देखील सापडते. तिला मोठ्या प्रमाणात ट्रोलही केले जाते. मात्र उर्फी ट्रोल करणाऱ्यांकडे जास्त लक्ष देत नाही. ती तिचे नवीन फॅशन चालूच ठेवते.
Poco M6 Pro 5G । दहा हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा ‘पोको’चा हा नवीन फोन
अनेकदा उर्फीला तीच्या कपड्यांमुळे जीवे मारण्याच्या धमक्या देखील मिळाल्या आहेत मात्र याचा देखील उर्फीवर काहीच परिणाम होत नाही. मागच्या काही दिवसांपूर्वी भाजप नेत्या चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांचा कपड्यांविरोधात मोठा वाद झाला होता. एवढेच नाही तर सोशल मीडियावरून देखील उर्फीला कपड्यांसाठी नेहमीच टोकले जाते मात्र उर्फी याकडे जास्त लक्ष देताना दिसत नाही. (Urfi Javed Viral Video )
Sanjay Raut । “पिसाळलेलं कुत्र चावलं त्यामुळं…” संजय राऊत यांच्यावर शिवसेना नेत्याची बोचरी टीका
सध्या देखील नुकताच उर्फी जावेदचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ती तिच्या नव्या आणि अतरंगी लुक मध्ये दिसत आहे. उर्फी जावेद हिचा लुक पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. अनेक जणांनी डोक्याला हात लावून घेतला आहे. उर्फी जावेद ही काळ्या रंगाच्या बिकिनी लुक मध्ये दिसत आहे. मात्र या बिकिनीला चक्क खिळे लावले असल्याचे दिसत आहे. तिने बिकिनी सोबत स्कर्ट देखील घातले आहे.
Mukesh Ambani । मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीने एका वर्षात २ लाख ६० हजार लोकांना दिला रोजगार
उर्फीच्या या लुक चे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वायरल झाले आहेत. तिच्या या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट देखील केल्या आहेत. उर्फीचा हा लूक पाहून अनेक जण कमेंट करत म्हटले आहेत की, ही उर्फी जावेद काय करेल याचा अंदाज बंधने खरोखरच अशक्य आहे. सध्या आता तिच्या नवीन लुकची सगळीकडे जोरदार चर्चा होताना दिसत आहे.