Urfi Javed । उर्फी जावेद सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. महत्वाचं म्हणजे तिच्या अतरंगी फॅशनमुळे ती सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय ठरत असते. सध्या मात्र उर्फी जावेदीच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. उर्फी जावेद हिच्या विरोधात थेट मुंबईच्या ओशिवारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. एक व्हिडिओ करणे उर्फीला चांगलेच महागात पडले असल्याचे दिसत आहे.
खोटा व्हिडिओ बनवून मुंबई पोलिसांची बदनामी केल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कालपासून उर्फीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होताना दिसला. यामध्ये छोटे कपडे घातल्याने पोलिसांकडून उर्फीला अटक असा व्हिडिओ उर्फी जावेदने तयार केला होता. मात्र तो व्हिडिओ फेक होता आणि स्वतःच उर्फी जावेदने तयार केला होता. आता तोच व्हिडिओ बनवणे उर्फीच्या चांगलेच अंगलट आले आहे.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाल्याने अखेर उर्फी जावेद हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फक्त उर्फी जावेद हिच नाही तर ओशिवारा पोलिसांनी उर्फी जावेद आणि दोन अनोळखी महिलाविरुद्ध गुन्हा दाखल केला. उर्फी जावेदने तयार केलेल्या व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तोतया पोलीस निरिक्षकला अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर व्हिडिओमध्ये वापरण्यात आलेली चारचाकी गाडी देखील पोलिसांनी जप्त केली आहे.