Urfi Javed viral video । कपड्यांवरून उर्फी जावेदला काकांनी सुनावले अभिनेत्री थेट म्हणाली; “तुझ्या बापाचे…”

The actress directly told Urfi Javed about her clothes; "Your father's…"

Urfi Javed viral video । मुंबई : उर्फी जावेद हे नाव सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. उर्फी कधी तिच्या कपड्यांमुळे तर कधी तिच्या बेधडक वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते अनेकदा उर्फीला तिच्या कपड्यांमुळे ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागतो. तसेच कपड्यांमुळे ती वादाच्या भोवऱ्यात देखील सापडते मात्र कोण काय बोलेल याकडे उर्फी कधीही लक्ष देत नाही ती तिची अतरंगी फॅशन चालूच ठेवते.

Harshvardhan Jadhav । आत्ताची सर्वात मोठी बातमी! माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा झटका

उर्फीचे (Urfi Javed ) सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत असतात. सध्या देखील उर्फीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मात्र हा व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. उर्फीचा हा व्हायरल होणारा व्हिडिओ सार्वजनिक ठिकाणचा असून यावेळी उर्फीला एक व्यक्ती खडे बोल सुनावताना दिसत आहे.

Suriya | सूर्याच्या वाढदिवसाच्या दिवशीच त्याच्या दोन चाहत्यांसोबत घडला धक्कादायक प्रकार; ‘या’ कारणामुळे गेला जीव

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, उर्फीला तो व्यक्ती म्हणतो, “तू इंडियाचे नाव खराब करत आहेस… तू इंडियाचे नाव खराब करायचे नाही,,, हे ऐकून उर्फी चांगली संतापती आणि ती म्हणते काका तुमच्या बापाचे काही जात आहे का? मात्र तो व्यक्ती परत तिला म्हणतो, इंडियाचे नाव खराब करायचे नाही. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वायरल होत आहे.

Gyanvapi Case । ज्ञानव्यापी मशीदीचे सर्वेक्षण करू नये; सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश!

वायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक मुलगी उर्फीला शांत राहण्यास सांगत आहे. त्याचबरोबर त्या व्यक्तीला देखील समजावून सांगण्याचे प्रयत्न करत आहे. या व्हिडिओवर नेटकरी देखील वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत.

Ajit Pawar । आमदारांच्या निधी वाटपात ‘दादा’गिरी? अजित पवारांनी अखेर सोडलं मौन, म्हणाले…

Spread the love