Urfi Javed Viral Video । मुंबई : अभिनेत्री उर्फी जावेद सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. ती तिच्या अतरंगी फॅशन मुळे सोशल मीडियावर चर्चेच कारण बनत असते. कपड्यांमुळे उर्फीला कायम ट्रोल केले जाते मात्र याकडे उर्फी जास्त लक्ष देत नाही. ती आपली अतरंगी फॅशन चालूच ठेवते. सोशल मीडियावर उर्फीचे कायम नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या देखील उर्फीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून चाहत्यांना देखील मोठा आश्चर्याचा धक्का बसला आहे. (Urfi Javed Viral Video)
Government Scheme । शेतकरी बनणार उद्योजक! सरकार देत आहे 50 लाख रुपये, असा घ्या लाभ
उर्फीने तिच्या अतरंगी फॅशनमुळे अगदी कमी वेळात एक खास ओळख निर्माण केली आहे. उर्फी जावेचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. चाहते तिच्या फोटोची आणि व्हिडिओची आतुरतेने वाट पाहत असतात, सध्या देखील उर्फीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये उर्फी साडी घातलेली दिसत आहे. त्यामुळे तिचे अनेकांनी कौतुक देखील केले आहे.
Onion Rate । कांदा निर्यातीवरून शेतकरी संघटना आक्रमक! चक्काजाम आंदोलन करत केली ‘ही’ मागणी
व्हायरल व्हिडिओवर अनेकांनी वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत. काही जण उर्फीचे कौतुक करत आहेत तर काहीजण नेहमीप्रमाणे उर्फीला ट्रोल करताना दिसत आहेत. “तू साडी मध्ये खूप छान दिसते रोज अशीच साडी घालत जा” अशी एका नेटकऱ्याने कमेंट केली आहे. तर दुसऱ्या नेटकऱ्याने “हे काय नवीनच?” अशी कमेंट केले आहे, अशा अनेक विचित्र कमेंट उर्फीला या व्हिडिओवर येत आहेत.
Samrtphone Charging | तुम्हीही स्मार्टफोन 100% चार्ज करताय? तर थांबा, ही बातमी एकदा वाचाच