Site icon e लोकहित | Marathi News

उर्फी जावेदला चित्रा वाघ यांनी सुनावले; चक्क अटक करण्याची केली मागणी!

Urfi Javed was narrated by Chitra Wagh; Demanded to be arrested!

बिगबॉस मधून पहिल्याच आठवड्यात बाहेर पडलेली अभिनेत्री उर्फी जावेद ( Urfi Jawed) सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. नुकतीच तीची एक पोस्ट देखील व्हायरल झाली होती. ज्यामध्ये तिने अंग झाकण्यासाठी फक्त नाश्त्याची प्लेट व ज्यूसच्या ग्लासचा वापर केला होता. खरंतर तिच्या या अजब बोल्ड लुक्स मुळेच ती कायम चर्चेत असते. सेफ्टी पिन्स, ब्लेड, गोणपाट वापरुन तिने आतापर्यंत तिचे बोल्ड आउटफिट बनवले आहेत.

संजय राऊत यांचे मोठे भाकीत; नवीन वर्षात सरकार घरी बसणार?

यामुळे तिच्या फॅशन सेन्सचे कौतुकही होते, मात्र त्याहून जास्त वेळा तिला टीकांना सामोरे जावे लागते. दरम्यान भाजप ( BJP) नेत्या चित्रा वाघ यांनी देखील आता उर्फीला तिच्या फॅशन सेन्स वरून चांगलेच सुनावले आहे. उर्फी जावेदचा एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत चित्रा वाघ यांनी मुंबई पोलिसांकडे तिच्या अटकेची मागणी केली आहे. शी…SSSS, अरे… हे काय चालले आहे मुंबईमध्ये ? सार्वजनिक ठिकाणी ही बाई नंगटपणा करत असून तिला रोखण्यासाठी मुंबई पोलिसांकडे IPC/CRPC आहेत की नाही? हिला तात्काळ बेड्या ठोका. एकीकडे निष्पाप महिला/मुली विकृतांच्या शिकार होताहेत तर ही बया अजून विकृती पसरवत आहे’.

मोठी बातमी! नाशिकमधील जिंदाल कंपनीला भीषण आग

असे म्हणत ‘नंगटपणा करणारी बाई’ या शब्दांत चित्रा वाघ ( Chitra Wagh) यांनी उर्फी जावेदवर टीका केली आहे. यावर नेटकऱ्यांनी देखील विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. केंद्रात व राज्यात तुमचेच सरकार असून दोन्हीकडे गृहमंत्री कोण हे देखील तुम्हाला चांगलेच माहीत आहे अशी खोचक टीका एका युजरने यावर केली आहे तर काही युजर्सनी चित्रा वाघ यांना पाठिंबा देत उर्फी सारख्या मुलींना शासन होणे गरजेचे आहे. असे सांगितले आहे.

ऋषभ पंतच्या भेटीनंतर अनुपम खेर यांनी दिला मोलाचा सल्ला, म्हणाले…

Spread the love
Exit mobile version