सेलेब्रिटींचा फॅशनसेन्स जबरदस्त असतो. ते प्रसिद्धीसाठी कधी काय करतील याचा अंदाज सामान्य माणसाला लागत नाही. दरम्यान इंटरनेट सेन्सेशन व प्रसिध्द फॅशन आयकॉन उर्फी जावेद देखील तिच्या फॅशन सेन्स मुळे लोकांच्या लक्षात राहिली आहे. उर्फीचा विचित्र फॅशन सेन्स (Fashoin Sense) हा लोकांच्या कायम चर्चेचा विषय आहे. कारण, ती तिच्या अंतरंगी फॅशन सेन्सने आपल्या चाहत्यांना नेहमी धक्का देत असते. आता देखील उर्फीच्या अंतरंगी फॅशनचा एक लूक व्हायरल होत आहे.
रानजनावरांची भीती, रात्रीची वीज, बळीराजाची परिस्थिती आहे तशीच!
उर्फी जावेदचा ( Urfi Javed) धक्कादायक फॅशन सेन्स असणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तिने शरीर झाकण्यासाठी कपड्यांचा वापर न करता चक्क नाश्त्याच्या प्लेटचा व ज्यूसचा वापर केला आहे. एका हातामध्ये नाश्त्याची प्लेट व दुसऱ्या हातात ज्यूसचा ग्लास घेऊन उर्फी या व्हिडीओमध्ये दिसत आहे. ब्रेकफास्ट असे कॅप्शन देत उर्फीने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला असून या लूक मुळे ती प्रचंड प्रमाणात ट्रोल झाली आहे.
मोठी बातमी! नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदींचे निधन
याशिवाय तिच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. एकाने तर चक्क ‘निर्लज्जबाई भारतातून पळून जा’ अशी कमेंट केली आहे. तसेच ‘मी हिला अनफॉलो करत आहे. तुम्ही सुद्धा हिला अनफॉलो करा अशा प्रतिक्रिया सुद्धा या व्हिडिओवर आल्या आहेत. बिगबॉस च्या घरातून अगदी कमी दिवसांत हकालपट्टी होऊन देखील उर्फीची लोकप्रियता लोकांच्यात वाढली आहे.
शरद पवार कुटुंबियांची सीबीआय चौकशी होणार? लवासा प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल