अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. विशेष म्हणजे उर्फी तिच्या कपड्यांमुळं चर्चेत असते. अनेकदा तिच्या या फॅशनसेन्समुळे तिला ट्रोल देखील करण्यात येतं. मात्र उर्फी ट्रोलर्सकडे जास्त लक्ष नाही देत. उर्फी जावेद इंस्टाग्रामवर जास्त सक्रिय असते. त्याचबरोबर आता ती ट्विटरवर देखील सक्रिय होत आहे.
अमोल कोल्हे अमृता खानविलकरबरोबर अडकणार लग्नबंधनात? चर्चांना उधाण
उर्फीने एक ट्विट करत लिहिले होते की, “आत्तापर्यंत मी कुणाच्या भावना दुखावल्या असतील मी तुमची माफी मागते. आता यापुढील काळात तुम्हाला दुसरीच उर्फी पाहायला मिळेल. आता उर्फीचं दुसरं रुप पाहण्यासाठी तुम्ही तयार रहा. मी माझ्या वेशभूषेत बदल करणार असल्याचे उर्फीनं यावेळी म्हटले होते. त्यामुळे तिचे ट्विट चर्चेत होते. मात्र यानंतर उर्फीने दुसरं ट्विट करत सर्वांना एप्रिल फुल बनविले आहे.
दुसरं ट्विट करत उर्फी म्हणाली, “एप्रिल फूल. मला माहीत आहे की मी खूप बालिश आहे,” असं ट्वीट उर्फीने केलं आहे. त्यामुळे आता उर्फी तिची फॅशन सोडणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. या ट्विटननंतर नेटकरी चांगलेच संतापले आहेत.
मोठी बातमी! समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; तीन जण जागीच ठार
April fool 🤓🤓🤓
— Uorfi (@uorfi_) April 1, 2023
I know so kiddish of me