Site icon e लोकहित | Marathi News

Urfi Javed: उर्फीने चक्क फुफ्फुसांच्या आकाराचा ड्रेस केला परिधान, पाहा VIDEO

Urfi wears a lung-shaped dress, see VIDEO

मुंबई : टीव्ही इंडस्ट्रीतील फेमस अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) ही तिच्या वेगवेगळ्या फॅशनमुळे (fashion) चर्चेत असते. उर्फी जावेद तिच्या फॅशन आणि तिच्या वक्तव्यांमुळे नेहमी वादाच्या भोवऱ्यात सापडते. अतरंगी फॅशन सेन्सने उर्फी तिच्या चाहत्यांमध्ये नेहमी खळबळ निर्माण करत असते. एक नाही दोन नाही तर उर्फीने तिच्या फॅशनवर अनेक एक्सपेरिमेंट करत न्यूड, सेमी न्यूड आणि टॉपलेस (Topless) असे अनेक लुक केले आहेत. उर्फीने कधी दगडांपासून, ब्लेड पासून, चमकी पासून तर कधी दोऱ्यापासून ड्रेस तयार करून परिधान केले आहे. दरम्यान अशातच उर्फीने असाच काहीतरी आश्चर्यचकित लुक केला आहे. ज्यामुळे चाहत्यांमध्ये खळबळ निर्माण केली आहे.

कांदा दरवाढीबाबत अजूनही प्रश्नचिन्ह, सर्वसामान्यांना मिळतोय दिलासा पण शेतकरी बंधूंना बसू शकतो फटका

सध्या उर्फीने तिच्या सोशल मीडियावर तिचा लेटेस्ट लुक शेअर केला आहे. या लुकमध्ये तिने चक्क फुफ्फुसाच्या आकाराचे (Lung shaped) डिझाईन केलेला बॅकलेस टॉप (Backless Top) परिधान केला आहे. या पोस्टला उर्फीने कॅप्शन दिले आहे, ‘धूम्रपान आरोग्यासाठी हानिकारक आहे.’ उर्फीच्या या पूर्ण लुक बद्दल बोलायचे झाले तर यामध्ये उर्फीने फुफ्फुसाच्या आकाराचे बॅकलेस टॉप परिधान केलेले असून त्याखाली बॅगी पॅन्ट परिधान केली आहे.

मोठी बातमी! फटाका स्टॉलला आग लागून दोघांचा मृत्यू

दरम्यान उर्फीचा हा लुक बघून चाहत्यांना तर आश्चर्याचा धक्काच बसला आहे. फक्त धक्काच नाही तर काही नेटकऱ्यांनी उर्फीच्या या लुकवर कॉपीकॅटचा आरोप केला आहे. नेटकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हा लुक बेला हदिदच्या लुकची कॉपी आहे जो तिने कान्स फेस्टिवल 2021 मध्ये केला होता. उर्फीच्या पोस्टवर एकवापरकर्ता कमेंट करत म्हणाला आहे, ‘ देवा देवा, या पोस्ट ने सगळं मुड खराब केला आहे.’ तर दुसरा कमेंट करत म्हणाला आहे, ‘धूम्रपानापेक्षा जास्त तू घातक आहेस.’

Arjun Kapoor: मलायकाच्या वाढदिवसानिमित्त अर्जुन कपूरने शेअर केला रोमँटिक फोटो; पाहा PHOTO

Spread the love
Exit mobile version