प्रसिद्ध माॅडेल आणि अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) नेहमीच चर्चेत असते. उर्फी सोशल मीडियावर (Social Media)सतत सक्रिय असते. उर्फी चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी फोटो (photo) आणि व्हिडिओ (video) शेअर करत असते. अनेकदा उर्फीने पोस्ट शेअर केल्यानंतर तिला ट्रोल केले जाते. उर्फीची फॅशन तिला कधी कधी अडचणीत आणते. पण तरीही उर्फी मागचा पुढचा विचार न करता पोस्ट शेअर करते.
आई श्रीदेवीच्या आठवणीत जान्हवी कपूर भावूक; फोटो शेअर करत
उर्फीचे फॅन फाॅलवर्स प्रचंड आहेत. यादरम्यान, उर्फी आता एका शो मध्ये काम करणार असल्याचे समोर आले आहे. माध्यमातील वृत्तानुसार, ‘खतरों के खिलाडी १३’ च्या टीमने उर्फी जावेदला या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी विचारणा केली आहे. इतकंच नाही तर उर्फीने देखील तिचा होकार कळवला आहे.
मोठी बातमी! संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी
जर सर्व काही ठीक झाले तर उर्फी लवकरच खतरों के खिलाडी सीझन १३च्या शूटिंगसाठी रोहित शेट्टीसोबत दक्षिण आफ्रिकेत जाणार आहे. त्याचवेळी या बातमीने उर्फीच्या चाहत्यांचा उत्साह गगनाला भिडला आहे. नेहमीच बेधडकपणे बोलणारी ही अभिनेत्री रोहित शेट्टीच्या धमक्यांना किती हिंमतीने तोंड देते हे पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे.
ऊसतोड मजुरांकडून शेतकऱ्यांची लूट; ऊस तुटला जाईल की नाही? या भीती