भारतीय क्रिकेट संघातील उत्कृष्ट् खेळाडू ऋषभ पंत (Rishabh Pant) याचा नुकताच भीषण अपघात झाला आहे. माहितीनुसार, ऋषभ सध्या मुंबईतल्या कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात असून त्या ठिकाणी त्याच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, आता उर्वशी रौतेलाच्या एका फोटोची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
मागच्या काही दिवसांपासून उर्वशी आणि क्रिकेटर पंत सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत आहेत. उर्वशीने सध्या तिच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर स्टोरी टाकली आहे. यामध्ये तिने कोकिलाबेन धिरुभाई अंबानी रुग्णालयाच्या बाहेरचा फोटो शेअर केला आहे.
‘वेड’ चित्रपटाने ६ दिवसात जमावला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला
उर्वशीच्या या स्टोरीमुळे ती ऋषभला भेटायला रुग्णालयात गेली का? अशा चर्चाना उधाण आले आहे. दरम्यान, ऋषभच्या अपघात झाला त्यावेळी उर्वशीने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर स्वतःचा एक फोटो पोस्ट केला होता. आणि या फोटोला तिने ‘प्रार्थना करत आहे’ असे कॅप्शन दिले होते. त्यावरुन देखील पुन्हा एकदा या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं होतं.