Site icon e लोकहित | Marathi News

ऋषभ पंतच्या अपघातानंतर उर्वशी रौतेलाची इंस्टाग्राम पोस्ट चर्चेत

Urvashi Rautela's Instagram post in discussion after Rishabh Pant's accident

भारतीय क्रिकेट संघातील उत्कृष्ट् खेळाडू ऋषभ पंत (Rishabh Pant) याच्या गाडीचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामध्ये खेळाडू ऋषभ पंत गंभीर जखमी झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामध्येच आता अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) ने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. सध्या उर्वशीची पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे.

जखमी अवस्थेत तडफडणाऱ्या ऋषभ पंतचा अपघातांनंतर सीसीटीव्ही फुटेज समोर; पाहा VIDEO

मागच्या काही दिवसांपासून उर्वशी आणि क्रिकेटर पंत सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत आहेत. दरम्यान ऋषभच्या अपघातानंतर उर्वशीने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर स्वतःचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोला तिने ‘प्रार्थना करत आहे’ असे कॅप्शन दिले आहे. सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत असून नेटकरी यावर वेगेवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

क्रिकेटर पंतच्या तब्येतीबद्दल बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी दिली माहिती, म्हणाले…

दरम्यान, बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ऋषभ पंत याच्या तब्येतीबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी याबाबत एक ट्विट केले आहे. ट्विट करत त्यांनी लिहिले की, “माझे विचार आणि प्रार्थना ऋषभ पंतच्या पाठीशी आहेत कारण तो तंदुरुस्त होण्याच्या मार्गावर संघर्ष करत आहे. मी त्याच्या कुटुंबीयांशी आणि त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी बोललो आहे. ऋषभची प्रकृती स्थिर असून त्याची तपासणी सुरू आहे. आम्ही त्याच्या प्रगतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत आणि त्याला आवश्यक ते सर्व सहकार्य देऊ”. असे ट्विट त्यांनी केले आहे.

मोठी बातमी! भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या कारचा भीषण अपघात

Spread the love
Exit mobile version