मुंबई : शेतीतून जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी शेतकरी जास्तीत जास्त रासायनिक खतांचा वापर करतात. पण रासायनिक खतांमुळे जमिनीचे आरोग्य देखील खालावते हे देखील पाहणे महत्त्वाचे आहे. जमिनीमधील सेंद्रिय कर्ब हा खूप महत्त्वाचा असून त्याचे प्रमाण हे 0.5 टक्क्याच्या खाली घसरले त्यामुळे सेंद्रिय खतांचा वापर जास्त प्रमाणात करणे खूप गरजेचे झाले आहे.
सेंद्रिय खतांमध्ये अनेक खतांचा समावेश समावेश होतो. त्यामध्ये कोंबडी खत हा शेतीसाठी एक उत्तम पर्याय ठरत आहे. कोंबडी खताच्या वापराने मातीची भौतिक आणि जैविक तसेच रासायनिक क्षमता सुधारण्यास मदत होते. कोंबडी खताचा वापर केल्याने आपले पीक देखील जोमात घडून येते.
शेतकरी मित्रांनो! शेतीच्या बांधावर निवडुंगाची लागवड करा आणि कमवा लाखो रुपये
‘या’ पद्धतीने वापरा कोंबडी खत होईल फायदा
१) पेरणीच्या आगोदर मशागत करताना जमिनीमध्ये एक ते दीड महिना कोंबडी खत चांगल्या पद्धतीने मिसळून घ्यावे. व यानंतर कुळवाची पाळी द्यावी.
२) कोंबडी खत पिकाला देताना ते उभ्या पिकामधे किंवा जमिनीत मिसळून कधीच देऊ नये. एक महिना अगोदर त्यावर पाणी शिंपडून ते थंडकरावे करावे. म्हणजेच त्यामधील कर्ब नत्र गुणोत्तर स्थिर राहते आणि चांगल्या प्रकारे अन्नद्रव्य पिकांना मिळते.
३) उभ्या पिकामध्ये कोंबडी खत टाकताना जमीन ओली करून घ्यावी. जर ओलावा नसेल तर पीक पिवळे पडण्याची दाट शक्यता असते.
४) जमीन व पीक लागवडी नुसार प्रति एकरी पाच ते 20 टन कोंबडी खताचा वापर केल्याने फायदेशीर ठरेल आणि उत्पन्न देखील भरघोस निघेल.
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी घेतले अभिनेते नाना पाटेकरांच्या घरच्या गणपतीचं दर्शन