Site icon e लोकहित | Marathi News

‘स्वतःच्या सोयीनुसार वापरलं…’; अखेर घटस्फोटवर मानसी नाईकने व्यक्त केली मनातली सल

'Used at own convenience…'; Finally, Mansi Naik expressed his thoughts on divorce

प्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईक (Mansi Naik) कधी तिच्या अभिनयामुळे तर कधी तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत येत असते. ‘वाट बघतोय रिक्षावाला’, ‘बाई वाड्यावर या’ या गाण्यामुळे मानसी प्रचंड प्रसिद्धी झाली. तिने अनेक चित्रपटांमध्येही काम केल आहे. सध्या मानसी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.

सरपंचाला महिन्याला किती पगार मिळतो तुम्हाला माहितीये का? ऐकून तुम्हीही व्हाल थक्क, सरकार देते फक्त एवढेच वेतन

गेल्या काही महिन्यांपासून मानसी खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. मानसीने लग्नाला एक वर्ष होत नाही तोपर्यंत घटस्फोटाचा निर्णय घेतला. त्यामुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. तिने मोठ्या थाटामाटात प्रदीप खरेरासोबत लग्न केलं होत. दोघांनी देखील एकमेकांवर गंभीर आरोप केले.

Koyta Gang | पुण्यात कोयता गँगचा पुन्हा एकदा धुमाकूळ, असच चालू राहिले तर पुण्याचाही बिहार होणार का?

मानसी सोशल मीडियावर सक्रिय असते. तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर खूप कमी वेळात प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे. घटस्फोटानंतर मानसीने सोशल मीडियावर एक भली मोठी पोस्ट शेअर केली आहे. सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असून अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. पोस्ट वाचून चाहते एकापेक्षा एक भन्नाट कमेंट्स करत आहेत.

धक्कादायक! पाच वर्षाच्या मुलाचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू

पोस्टमध्ये मानसीने वैयक्तिक आयुष्याविषयी लिहीले आहे. तिने लिहीले की, ज्यांच्याबद्दल अतोनात विश्वास असतो. ती माणसं कधीकधी इतकी धक्कादायक वागतात की त्या धक्क्याने आपण कोसळून जाऊ असं वाटू लागतं. जवळच्या माणसांनी केलेले विश्वासघात फार जिव्हारी लागणारे असतात‌. त्यामुळे लौकिक अर्थाने आपलं फारसं नुकसान झालेलं नसलं तरी भावनिक पातळीवर कधीही न भरून निघणारी हानी झालेली असते. माणसांवरचा विश्वास उडू लागतो अशाने फार हट्ट करावासा वाटत नाही.

च्युइंगम खाण्याची सवय असेल तर लगेच सोडा नाहीतर…

Spread the love
Exit mobile version