राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाणे जिल्ह्याध्यक्ष आनंद परांजपे ( Aanand Parnjape) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अपशब्द वापरल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा गुन्हा एकाच पोलीस ठाण्यात दाखल झाला नसून वेगवेगळ्या चार पोलीस ठाण्यांमध्ये आनंद परांजपे यांच्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद झाली आहे. 153, 501, 504 अन्वये हे गुन्हे दाखल करण्यात आले असून कल्याणमधील बाजारपेठ आणि कोळसेवाडी व डोंबिवलीतील रामनगर आणि मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
माजी खासदार आनंद परांजपे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या विरोधात काही दिवसांपूर्वी ट्विट केले होते. यामध्ये मुख्यमंत्र्यांसाठी अपशब्दाचा वापर करण्यात आला होता. या ट्विटनंतर बाळासाहेबांच्या शिवसेनेने म्हणजेच शिंदे गटाने खासदार आनंद परांजपे यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ आनंद परांजपे यांच्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी कोचर दांम्पत्याला सीबीआय कडून अटक
याबाबत आता आनंद परांजपे यांच्यावर लवकरच कारवाई करण्यात येणार आहे. या कारवाई संदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी नुकतेच एक ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी आनंद परांजपे यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या NC आता FIR मध्ये रूपांतरित करण्यात आल्याची माहिती दिली आहे. तसेच आपल्या राज्याची वाटचाल पोलिसी राज्याकडे चालली की काय ? असा टोला देखील लागवला आहे.
दाक्षिणात्य व बॉलिवूड चित्रपटांमध्ये तुलना केली जाऊ नये; ‘केजीएफ’ स्टार यशचे मोठे वक्तव्य