मुंबई : बिग बॉस मराठी फेम उत्कर्ष शिंदे (Utkarsh Shinde) सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. काल १५ ऑगस्टच्या निमित्ताने उत्कर्षने त्याच्या इंस्टाग्रामवरून एक पोस्ट लिहिली आहे. ती पोस्ट सध्या खूप चर्चेत आहेत. पोस्टमध्ये उत्कर्षची गाडी सिग्नलवर थांबली असता उत्कर्षसमोर एक तृतीयपंथी व्यक्ति येऊन थांबली. यानंतर उत्कर्षने त्या व्यक्तिसोबत एक सेल्फी घेत त्याविषयी पोस्ट शेअर केली आहे. त्याने पोस्टमधून तृतीयपंथी लोकांच्या व्यथा आणि त्यांच्या वेदनांबद्दल कळकळ व्यक्त केली आहे.
उत्कर्षने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत कॅप्शन मध्ये लिहिले की, आज तुला पाहिल आणि विचार बदलले …… “जो भरा नहीं है भावों से, जिसमें बहती रसधार नहीं । वह हृदय नहीं है पत्थर है, जिसमें स्वदेश का प्यार नहीं।” राष्ट्रप्रेम सर्वोच्च प्रेम म्हटले आहे. प्रत्येक व्यक्तिला आपल्या जन्मभूमी वर निस्वार्थ प्रेम असावे. आज सिग्नल ला माझी कार थांबली आणि समोर तू दिसलीस,तुला पाहून खरंच संकुचित विचारांच्या लोकांना तू आज चपखल उत्तर दिलंस .कोण तू ? कुठली तू ?तू नर ? कि नारी? ,ह्या वरून तुझे परीक्षण आज पर्यंत भवताल च्या बऱ्याच लोकांनी केले असेल . पण तू त्यांच उत्तर “तू प्रथम भारतीय आहेस हे तू आज तुझ्या पेहेराव्यातूनच नाही तर तुझ्या बोलण्यातून ठासून दाखवलंस”.
पुढे त्याने लिहिले, कार ची काच मी जेव्हा खाली घेतली आणि तू हसत किती सकारात्मकतेने “साहब भारत माता कि जय हो ” म्हणालीस . आणि पैसे नहीं चाहिये आज .आज सिर्फ दुआ दूंगी म्हणत डोक्यावरून हाथ फिरवलास आणि प्रवास भर मी तुझ्यातल्या माणुसकीला ,देश प्रेमाला मनोमन सलाम करत राहिलो . 75व्या स्वातंत्र्य दिनी आज खरंच भासल बुरसटलेल्या भेद भाव मानणाऱ्या,माणसाला माणसा पासून दूर ठेवणाऱ्या विचारानं पासून काहींना अजूनही स्वातंत्र्य मिळणे बाकी आहे.
उत्कर्षची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.