
Sharad Pawar । राज्यात सध्या निवडणुकीचे (Loksabha election) चांगलेच वारे वाहत आहे. लोकसभेच्या तोंडावर सर्व राजकीय पक्ष जोरात प्रचार करत आहेत. राज्यात यंदा कोणाचे सरकार येणार? याबाबतची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. पक्षाने तिकीट नाकारल्याने अनेक नेते पक्षांतर करताना दिसत आहेत. अशातच आता पुन्हा एकदा भाजपला (BJP) ज्येष्ठ नेते शरद पवारांनी धक्का दिला आहे. (Latest marathi news)
दोन दिवसांपूर्वी उत्तम जानकर (Uttam Jankar) यांनी नागपूरला जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांच्यात सकारत्मक चर्चा झाल्याचे बोलले जात होते. पण आज हेच उत्तम जानकर शरद पवारांच्या भेटीला पोहोचले आहेत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, उत्तम जानकर हे शरद पवार यांच्या भेटीसाठी पुण्यात दाखल झाले आहेत.
Kailas Patil । मोठी बातमी! ठाकरे गटाच्या आमदाराला प्रचारसभेत आली भोवळ
“तालुक्यातील आमच्या सर्व कार्यकर्त्यांची आणि मोहिते-पाटील यांच्या कार्यकर्त्यांची प्राथमिक चर्चा झाली असून आता तशीच चर्चा शरद पवारसाहेबांसमोर होणार आहे. या बैठकीत महत्त्वाचा निर्णय होईल. त्यासाठी मी आणि मोहिते पाटील पवार साहेबांची भेट घेणार आहोत” असं उत्तम जानकर म्हणाले आहेत. त्यामुळे आता या भेटीदरम्यान कोणती चर्चा होणार याकडे सर्वांचे लक्ष असेल.
Sharad Pawar । शरद पवारांचा नवा डाव, अजित पवार गटाच्या बड्या नेत्याची घेतली भेट