Site icon e लोकहित | Marathi News

Uttarakhand Accident । उत्तराखंडमध्ये प्रवाशी बसचा भीषण अपघात; 15 जणांचा मृत्यू

Uttarakhand News

Uttarakhand Accident । उत्तराखंडच्या अल्मोडा जिल्ह्यातील रामनगरजवळ एक प्रवासी बस भीषण अपघातात खोल दरीत कोसळली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. बसमध्ये सुमारे 40 प्रवाशी प्रवास करत होते, जेव्हा चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला. सध्या घटनास्थळी बचाव कार्य त सुरू आहे आणि मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Manoj Jarange Patil । ब्रेकिंग! मनोज जरांगेंकडून विधानसभा निवडणुकीतून माघार; उमेदवार उभा करणार नाहीत

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी गौरीखालहून रामनगरकडे निघालेल्या बसने गढवाल-रामनगर मार्गावरील सल्ट गावाजवळ एक तीव्र वळण घेत असताना चालकाचे नियंत्रण सुटले. या अपघातानंतर बस खोल दरीत कोसळली आणि अनेक प्रवाशी बसमधून बाहेर फेकले गेले. अपघाताच्या तासाभरातच काही जखमी प्रवाशांनी नियंत्रण कक्षाला माहिती दिली, ज्यामुळे बचाव कार्यात मदत झाली.

Ajit Pawar । ‘अजित पवार मर्दाची औलाद असते तर…’; जितेंद्र आव्हाडांचे धक्कादायक वक्तव्य

सध्या SDRF आणि पोलीस प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर बचावकार्य सुरू आहे. जखमी झालेल्या प्रवाशांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विनीत पाल यांनी स्पष्ट केले की, “सल्ट आणि रानीखेत येथून काही बचावपथके घटनास्थळी पाठवण्यात आली आहेत. या दुर्घटनेत किती लोकांचा मृत्यू झाला हे बचावकार्य पूर्ण झाल्यावरच सांगता येईल.”

Eknath Shinde । राजकारणातून मोठी बातमी! शिंदे गटाचा पुन्हा एक नेता नॉट रिचेबल

Spread the love
Exit mobile version