Valmik Karad case । बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड याची प्रकृती मंगळवारी रात्री अचानक बिघडली. मंगळवारी पुणे सीआयडीला शरण आलेल्या कराडला अटक करण्यात आली आणि बीड जिल्ह्यातील केज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला १५ दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली.
बुधवारी रात्री दीड वाजता त्याला केज न्यायालयातून बीड शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. यानंतर अचानक त्याची शारीरिक स्थिती बिघडली आणि त्याच्या शुगर लेव्हलमध्ये वाढ झाली. या परिस्थितीत डॉक्टरांनी त्याला तातडीने ऑक्सिजन दिला. या घटनेनंतर कराडची प्रकृती स्थिर होण्यासाठी उपचार सुरू करण्यात आले.
Prajkta Mali । प्राजक्ता माळींनी सुरेश धसांना सुनावलं, म्हटलं- “महिलांची अब्रू उडवणं योग्य नाही”
सीआयडीच्या कोठडीत असताना त्याच्या आरोग्याच्या समस्यांमुळे चिंता निर्माण झाली होती. कराडची शुगर पातळी वाढल्याने त्याला काही काळ ऑक्सिजन दिला गेला. सध्या त्याची स्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले जात आहे.
LPG Gas Cylinder Price Cut Today | खुशखबर! नववर्षाच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात