Praniti Shinde । मुंबई : काँग्रेसने (Congress) सोलापूर मतदार संघातून प्रणिती शिंदे यांना मैदानात उतरविले आहे. तसेच भाजपने सोलापूरमधून राम सातपुते यांना उमेदवारी दिली आहे. सोलापूरच्या राजकारणात राम सातपुते विरुद्ध प्रणिती शिंदे (Ram Satpute Vs Praniti Shinde) असा हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. अशातच प्रणिती शिंदेंचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. (Latest maarthi news)
Chhatrapati Sambhajinagar । धक्कादायक बातमी! राज्यात उष्माघाताने घेतला तरुणाचा बळी
वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Alliance) आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत सोलापूर,मुंबई उत्तर, माढा, हिंगोली, मुंबई मध्यसह 11 लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. दरम्यान, यापूर्वी वंचित बहुजन आघाडीने 8 उमेदवारांची यादी जाहीर केली होती आणि या यादीमध्ये अकोल्यातून प्रकाश आंबेडकरांना (Prakash Ambedkar) उमेदवारी दिली होती.
अशी आहे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची यादी
सोलापूर- राहुल गायकवाड
माढा- रमेश बारसकर
सातारा- मारुती जानकर
धुळे- अब्दुर रहमान
हिंगोली- डॉ. बी.डी. चव्हाण
रावेर- संजय पंडीत ब्राह्मणे
जालना- प्रभाकर बकले
मुंबई उत्तर मध्य- अबुल हसन खान
रत्नागिरी-सिंधुदुर्ग- काका जोशी
लातूर- नरसिंगराव उदगीरकर
हातकणंगले- दादागौडा पाटील
Supriya Sule । “शरद पवार यांना संपवण्यासाठी…” सुप्रिया सुळे यांचे धक्कादायक वक्तव्य