पुण्यात (Pune) चिंचवड व कसबा विधानसभा पोट निवडणूकीचे (Chinchwad and Kasba election) धुमशान वाजत आहे. चिंचवड पोटनिवडणूकीसाठी भाजपकडून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र लक्ष्मण जगताप यांचे मोठे बंधू शंकर जगताप यांनी सुद्धा आपल्या वहिनींच्या विरोधात उमेदवारी जाहीर केली आहे. जगताप कुटुंबाकडून राजकीय हायहोल्टेज ड्रामा सुरू होतोय तोच महाविकास आघाडीमध्ये देखील राजकीय नाट्याला सुरवात झाली आहे.
ब्रेकिंग! आदिल खान गुन्हेगार? राखी सावंतने केला अत्यंत मोठा खुलासा; म्हणाली…
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी कडून नाना काटे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. सुरवातीपासून या जागेसाठी नाना काटे व राहुल कलाटे यांच्या नावांची चर्चा होती. मात्र अचानक राष्ट्रवादीने नाना काटे यांना संधी दिली आहे. नाराज झालेले राहुल कलाटे आता बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत.
दरम्यान, मावळचे आमदार सुनील शेळके हे कलाटे यांची मनधरणी करण्यासाठी गेले होते. माहिती नुसार कलाटे उमेदवारी अर्ज दाखल करण्यावर ठाम आहेत. तर वंचित बहुजन आघाडी राहुल कलाटे यांना अधिकृत करणार असल्याच्या तयारीला वेग आला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मागच्या काही दिवसापूर्वी राहुल कलाटे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात भेट झाल्या आहेत. त्यामुळे वंचित आघाडी राहुल कलाटे यांना उमेदवारी किंवा पाठिंबा देऊ शकतो.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत हायहोल्टेज ड्रामा! उमेदवारी न दिल्याने राहुल कलाटे करणार बंडखोरी