Maharashtra Loksabha । महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणुका पार पडणार निवडणुकीच्या (Maharashtra Loksabha 2024) तोंडावर असताना अजूनही काही जागांवर महायुती आणि महाविकास आघाडीत तोडगा निघाला नाही. निवडणुका जिंकण्यासाठी काही उमेदवार आपल्या मतदारसंघातील मतदारांना कसलेही आश्वासन देतात. असेच एका प्रचारादरम्यान महिला उमेदवाराने विचित्र आश्वासन दिल्याने त्याची चर्चा होत आहे. (Latest marathi news)
Supriya Sule । “शरद पवार यांना संपवण्यासाठी…” सुप्रिया सुळे यांचे धक्कादायक वक्तव्य
““मी लोकसभेची निवडणूक (Loksabha election) जिंकली तर प्रत्येक गावात फक्त बिअर बार सुरु करणार. तसेच खासदार निधीतून परदेशी दारु आणि बिअर देखील उपलब्ध करुन देईन. खूप गरीब लोकांना दारु पिण्यामध्ये समाधान मिळत असून त्यांना देशी दारुवर समाधान मानाव लागत. मला त्यांना परदेशी दारुचा आनंद द्यायचा आहे. जिथे गाव, तिथे बिअर बार असा प्रचार वनिता राऊत (Vanita Raut) करत असल्याने एकच खळबळ उडाली आहे.
Maharashtra politics । अजित पवार गटातील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर, मंत्र्यांसमोरच कार्यकर्ते भिडले
वनिता राऊत या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून (Chandrapur Lok Sabha Constituency) निवडणूक लढवत आहेत. त्यांनी यापूर्वीही निवडणूक लढवली आहे. वनिता राऊत यांनी 2019 साली नागपूरमधून लोकसभा, तसेच 2019 मध्येच चिमूरमधून विधानसभेची निवडणूक लढवली होती. विशेष म्हणजे त्यावेळी त्यांनी प्रचारादरम्यान मतदारांना हेच आश्वासन दिल्याने त्यांच डिपॉझिट जप्त केलं होतं.
Car Accident News । भीषण अपघात, भरधाव वेगात स्कॉर्पिओ खांबाला धडकली, 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू