Varsha Gaikwad । आज लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान पार पडणार असून महाराष्ट्रातील ८ मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. मागील काही दिवसांपासून काँग्रेस पक्षामध्ये अनेक उलथापालथ होत आहे. पक्षातील अनेक नेत्यांनी भाजपची (BJP) साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच काँग्रेसने (Congress) सर्वात मोठी घोषणा केली आहे. (Latest marathi news)
Sharad Pawar । आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! शरद पवारांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट
निवडणुका तोंडावर असताना अजूनही उत्तर मध्य मुंबई लोकसभेच्या मतदारसंघातून महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हींकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली नव्हती. अखेर या जागेवर काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना मुंबईत लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारी जाहीर आहे. या जागेवरून मागील काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये धुसफूस सुरु होती.
Baramati Loksabha । सुनंदा पवार यांचं खळबळजनक वक्तव्य’ म्हणाल्या, “दोन-तीन दिवसांमध्ये…”
अखेर वर्षा गायकवाड यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे आता महायुती कोणाला संधी देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. दरम्यान, उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपच्या पूनम महाजन या विद्यमान खासदार असल्या तरी यावेळी पूनम महाजन यांचं तिकीट कापलं जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
Lok Sabha Election 2024 । लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज होणार मतदान