Varun Dhawan: वरुण धवनने ‘ए वतन मेरे वतन’ चित्रपटाची केली घोषणा केली, सारा अली खानची अशी केली नक्कल

Varun Dhawan announces 'Ae Watan Mere Watan' movie, imitates Sara Ali Khan

मुंबई : सारा अली खान लवकरच OTT चित्रपट ‘ए वतन मेरे वतन’ (A Watan Mere Watan) मध्ये दिसणार आहे. साराच्या (Sara ali Khan) या आगामी चित्रपटाची घोषणा वरुण धवनने (Varun Dhawan) एका खास पद्धतीने केली आहे. एवढेच नाही तर वरुणने ही घोषणा करून त्याच्या चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. कारण या चित्रपटात सारा अली खान एका शूर स्वातंत्र्यसैनिकाच्या (freedom fighters) भूमिकेत दिसणार आहे. सारा तिची भूमिका (role) साकारण्यासाठी खूप मेहनत घेत आहे. सारा पहिल्यांदाच पडद्यावर खऱ्या आयुष्यातील व्यक्तिरेखा साकारणार आहे.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ‘या’ तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार 22 कोटींची नुकसान भरपाई

वरुण धवनने मंगळवारी त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर सारा अली खानच्या सिग्नेचर स्टाईलमध्ये नवीन चित्रपटाची घोषणा केली. एका मजेदार व्हिडिओमध्ये, वरुणने नमस्तेने सुरुवात करून साराच्या व्लॉगिंग शैलीचे अनुकरण केले. वरुणने व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘आश्वासन दिल्याप्रमाणे, पण मी तुम्हाला याबद्दल सांगितल्याशिवाय स्वत:ला थांबवू शकत नाही.’

मोठी बातमी! दुर्गा विसर्जनादरम्यान पुरात 8 जण बुडाले तर 40 लोक बेपत्ता

हा चित्रपट याच महिन्यात प्रदर्शित होणार आहे. दारब फारुकी आणि कन्नन अय्यर लिखित ‘ए वतन मेरे वतन’ हा थ्रिलर ड्रामा, सत्य घटनांवर प्रेरित आहे. धर्माटिक एंटरटेनमेंट प्रॉडक्शन अंतर्गत, या चित्रपटाची निर्मिती करण जोहर आणि अपूर्व मेहता करत आहेत. तर सोमेन मिश्रा सह-निर्माता आहेत. दरम्यान या चित्रपटाचे दिग्दर्शन कन्नन अय्यर करत आहेत. अमेझॉन ओरिजिनल चित्रपट रिलीज झाल्यावर प्राइम सदस्यांसाठी 240 हून अधिक देश आणि प्रदेशांमध्ये उपलब्ध असेल. 

Priya Prakash: डोळा मारून सगळ्यांना वेड लावणाऱ्या प्रिया प्रकाशचे बोल्ड फोटो व्हायरल, पाहा एका क्लिकवर

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *