Loksabha Election । बिग ब्रेकिंग! गांधी घराण्याचा ‘हा’ वारस काँग्रेसच्या वाटेवर? बड्या नेत्यानं दिली पक्षात येण्याची ऑफर

Loksabha Election

Loksabha Election । केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निवडणुका जाहीर होताच राज्यात आचारसंहिता लागू झाल्या आहेत. सर्व राजकीय पक्ष आगामी लोकसभा (Loksabha Election 2024) निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर करत आहे. राजकीय पक्ष निवडणुकीत बड्या नेत्यांना डावलून नवीन चेहऱ्यांना संधी देत आहे.भाजपची नुकतीच पाचवी यादी जाहीर केली आहे. (Latest marathi news)

Topers Ad

Pakistan Terror Attack । धक्कादायक! पाकिस्तानात झालेल्या आत्मघाती हल्ल्यात ५ चिनी नागरिकांचा मृत्यू

भाजपनं (BJP) वरुण गांधी (Varun Gandhi) यांना पिलभित लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली नाही. विशेष म्हणजे पक्षात असताना वरुण गांधी यांनी केंद्राच्या अनेक धोरणांवर टीका केली होती. त्यामुळे त्यांना उमेदवारी दिली नाही, असे बोलले जात आहे. अशातच आता वरुण गांधी यांना काँग्रेसने (Congress) पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. त्यामुळे वरुण गांधी कोणता निर्णय घेतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Satara Loksabha । अजितदादांची नवी खेळी! ‘त्या’ जागेच्या बदल्यात मागितलेल्या जागेमुळे वाढली शिंदे-फडणवीसांची डोकेदुखी

काँग्रेसचे खासदार अधीररंजन चौधरी (Adhiraranjan Chaudhary) म्हणाले की,”भाजपनं ४४ वर्षीय वरुण गांधी यांना उमेदवारी नाकारली. पण वरुण गांधी यांनी जर काँग्रेसमध्ये प्रवेश केला तर आम्हाला खूप आनंद होईल. ते बडे नेते असून उच्चशिक्षित राजकारणी आहेत. त्यांचे गांधी कुटुंबाशी संबंध असल्याने भाजपनं त्यांना तिकीट दिल नाही. त्यामुळं वरुण गांधी यांनी काँग्रेसमध्ये यावं अशी आमची इच्छा आहे.”

Dharashiv News । धाराशिवमध्ये तुंबळ हाणामारी! पाच जखमी तर 125 पेक्षा जास्त जणांवर गुन्हा दाखल, नेमकं कारण काय?

Spread the love