Vasant More । ब्रेकिंग! वसंत मोरे शरद पवार गटाच्या वाटेवर?

Vasant More

Vasant More । पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) तडफदार नेते वसंत मोरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि मनसेला (MNS) मोठा धक्का बसला आहे. वसंत मोरे यांनी आपण पुण्यातील मनसेमधील अतंर्गत राजकारणाला कंटाळून राजीनामा देत असल्याचं स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता वसंत मोरे पुढची काय रणनीती ठरवतात? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (Latest marathi news)

Baramati Politics | सर्वात मोठी बातमी! बारामतीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट!

Ads

आगामी लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections) लढवण्यास वसंत मोरे उत्सुक आहेत. पण आता ते कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार? असा सवाल निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी वसंत मोरे यांनी खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर वसंत मोरे लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात सहभागी होणार, अशा चर्चांना उधाण आले आहे.

Uddhav Thackeray । निवडणुकीबाबत उद्धव ठाकरे यांचा सर्वात मोठा दावा; भाजपवर केले गंभीर आरोप

दरम्यान, मनसेमध्ये असताना वसंत मोरे यांच्यावर खडकवासलामध्ये मोर्चे बांधणीची जबाबदारी देण्यात आली होती. खडकवासला आणि पुणे शहराचा काही भाग हा बारामती लोकसभा मतदारसंघात येतो. ज्याचा फायदा शरद पवारांना होऊ शकतो. त्यामुळे लोकसभा निवडणुकीतील मदतीच्या बदल्यात विधानसभा निवडणुकीसाठी वसंत मोरेंना उमेदवारी देण्याचा शब्द शरद पवार गटाकडून दिला जाऊ शकतो, असे बोलले जात आहे.

Bjp । भाजपकडून फाटक्या साड्यांचं वाटप; धक्कादायक व्हिडीओ समोर

Spread the love