Vasant More । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) तडफदार नेते वसंत मोरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि मनसेला (MNS) मोठा धक्का बसला आहे. वसंत मोरे यांनी आपण पुण्यातील मनसेमधील अतंर्गत राजकारणाला कंटाळून राजीनामा देत असल्याचं स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता वसंत मोरे पुढची काय रणनीती ठरवतात? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (Latest marathi news)
वसंत मोरे यांनी आज दुपारी पुण्यातील शरद पवार गटाच्या पक्ष कार्यालयाला भेट दिली. त्यानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया देखील माध्यमांसमोर दिली आहे. आपल्याला शरद पवार साहेबांनी भेटायला बोलवलं होतं. त्यामुळे आपण येथे आलो असल्याचं वसंत मोरे म्हणाले. त्याचबरोबर लोकसभेची जर उमेदवारी मिळाली तर ते शरद पवार गटात प्रवेश करतील असं म्हटलं जात आहे.
Viral Video । चालू मेट्रोत घडला धक्कादायक प्रकार, पाहा व्हिडीओ
पत्रकारांशी वसंत मोरे यांनी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, तुर्तास आपण पक्ष प्रवेश करत नसून ही फक्त सदिच्छा भेट असल्याचं मोरे म्हणालेत. यामुळे त्यांची काय भूमिका आहे ही त्यांनी गुलदस्तात ठेवलीय. त्याचबरोबर वसंत मोरे कोणत्या पक्षात प्रवेश करणार याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे.