Vasant More । वसंत मोरे यांनी रात्री उशिरा शेअर केली फेसबुक पोस्ट अन् राजकीय वर्तुळात उडाली मोठी खळबळ

Vasant More

Vasant More । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) तडफदार नेते वसंत मोरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि मनसेला (MNS) मोठा धक्का बसला आहे. वसंत मोरे यांनी आपण पुण्यातील मनसेमधील अतंर्गत राजकारणाला कंटाळून राजीनामा देत असल्याचं स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता वसंत मोरे पुढची काय रणनीती ठरवतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ads

Jayant Patil । जयंत पाटील यांचे निलेश लंकेंबाबत सर्वात मोठे वक्तव्य

वसंत मोरे यांनी राजीनामा दिल्यापासून ते कोणत्या पक्षात जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मागच्या काही दिवसापूर्वीच वसंत मोरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे ते शरद पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. मात्र अद्याप वसंत मोरे यांनी याबाबत अधिकृत कोणतीच माहिती दिलेली नाही. दरम्यान सध्या वसंत मोरे यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर केल्यानंतर त्यांच्या भूमिकेबाबत सस्पेन्स आणखी वाढला आहे.

Madhya Pradesh | धक्कादायक! पैशासाठी विद्यार्थिनीने रचला अपहरणाचा कट

वसंत मोरे (Vasant More) यांनी फेसबुकवरून एक व्हिडीओ शेअर करत त्यांनी आपल्या भावना मांडल्या आहेत. ‘तरी पण निवडणूक एकतर्फी कशी होते बघोतच मी… ‘, अशी पोस्ट त्यांनी केली आहे. रात्री उशिरा शेअर केलेल्या पोस्टने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Pradeep Sharma । मुंबई पोलिसांच्या सुपरकॉपमधून प्रदीप शर्मा खुनी कसे झाले? धक्कादायक माहिती समोर

Spread the love