Vasant More । पुण्यातील डॅशिंग आणि आक्रमक नेते वसंत मोरे यांनी पुन्हा एकदा त्यांच्या आक्रमकतेचा परिचय दिला आहे. कात्रज भागात एका गाईची हत्या झाल्यानंतर संतापलेल्या मोरे यांनी स्वतः हातोडा हातात घेऊन आरोपींच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई केली आहे. या घटनेवर त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून आपला आक्रोश व्यक्त केला आहे. (Pune News )
Jalna Accident । जालन्यात बस आणि ट्रकचा भयानक अपघात! 5 जण जागीच ठार तर 14 जखमी
वसंत मोरे यांनी या घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रकरणातील आरोपींना जामीन होऊ देऊ नये, अशी मागणी केली आहे. “कात्रज भागात असं प्रकार पुन्हा होऊ देऊ नये. अन्यथा, आम्ही परिणामांची पर्वा न करता कारवाई करू,” असे त्यांनी स्पष्ट केले. मोरे यांच्या मते, गाईची हत्या करणारा आरोपी हिंदू धर्मातील असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे त्यांनी पुणे महानगरपालिका आणि पोलिस यंत्रणेकडे या प्रकरणात कठोर कारवाई करण्याचे आवाहन केले.
Yamaha R15M भारतीय बाजारात धमाकेदार रेसिंग बाईक; जाणून घ्या किंमत किती?
याबाबत वसंत मोरे यांनी पुढे म्हटले की, “त्या ठिकाणी असलेले अनधिकृत बांधकाम पाडले जावे.” त्यांनी पोलिसांना दूरध्वनीवरून सांगितले की, गोठ्याचे बांधकाम अवैध आहे आणि या प्रकरणी तात्काळ रिपोर्ट द्यावा. मोरे यांनी हेही सांगितले की, हा व्यक्ती दुसऱ्यांदा असाच गुन्हा करताना सापडला आहे, आणि त्याचे हे प्रकार वाढत आहेत.
सामाजिक कार्यकर्त्यांकडून वसंत मोरे यांच्या कारवाईचे स्वागत केले जात आहे, तसेच पुण्यातील नागरिकांमध्ये या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मोरे यांच्या या कृत्यामुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्था चांगलीच चर्चेत आली आहे. त्यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे इतर नेत्यांनीही अशा घटनांना कठोर प्रतिसाद देण्याची आवश्यकता आहे, असे मत व्यक्त केले जात आहे.
Manoj Jarange Patil । मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपोषणाच्या चौथा दिवशी मोठी माहिती समोर