
Vasant More । वसंत मोरे यांनी मागच्या काही दिवसापूर्वी मनसेची साथ सोडली असून सध्या ते पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील बड्या नेत्यांची भेट देखील घेतली. मात्र महाविकास आघाडीने पुणे लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे वसंत मोरे नेमका काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष होते. आता याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. (Politics News )

Ajit Pawar । अजित पवार गटाला मोठा धक्का! ‘या’ ठिकाणी मिळणार नाही घड्याळ चिन्ह
वसंत मोरे आज वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. आज दुपारी या दोन्ही बड्या नेत्यांची भेट होणार आहे. प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा न देता वेगळी भूमिका घेतली आहे. त्यांनी जवळपास आठ उमेदवारांची घोषणा देखील केली आहे. त्यामुळे आज वसंत मोरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये उमेदवारी संदर्भात चर्चा होऊ शकते.
Maharashtra Politics । नवनीत राणांविरोधात बच्चू कडू मैदानात! लवकरच करणार उमेदवाराची घोषणा
वसंत मोरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क देखील लावले जात आहेत. आता वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे यांना उमेदवारी मिळणार का? हे पाहणं देखील महत्त्वाचे ठरणार आहे.
Crime News । धक्कादायक! बहिणीच्या प्रेमविवाहाला मदत केल्याचा राग अनावर, तरुणाला चिरडलं कारखाली