Vasant More । सर्वात मोठी बातमी! वसंत मोरे करणार भाजपमध्ये प्रवेश? ‘त्या’ फोनवरून रंगली चर्चा

Vasant More

Vasant More । लोकसभा निवडणुकीपूर्वी राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा पक्ष मनसेला (MNS) मोठा झटका बसला आहे. पक्षाचे फायरब्रँड नेते वसंत मोरे यांनी सोशल मीडियाच्या (Social media) माध्यमातून राजीनामा दिल्याची माहिती दिली. साहेब.. मला माफ करा’, असे अशी पोस्ट शेअर करत वसंत मोरे यांनी मनसे पक्षाला रामराम ठोकला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून वसंत मोरे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Latest marathi news)

Cabinet meeting । आत्ताच्या घडीची मोठी बातमी! सरकारने अहमदनगर शहराचं नाव बदललं, हे असणार नवीन नाव

भाजपचे नेते मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांनी वसंत मोरे यांना फोन केला होता. त्यामुळे वसंत मोरे राजकीय वर्तुळात प्रवेश करणार अशी चर्चा रंगली आहे. पण या चर्चांना वसंत मोरेंनी पूर्णविराम दिला आहे. “मुरलीधर मोहोळांनी माझं सांत्वन करण्यासाठी फोन केला होता. तात्या तुझ्यासारख्या कार्यकर्त्यासोबत हे चुकीचं झालं. मोहोळांनी मला संघटनेसाठी फोन केला नाही तर मित्राच्या नात्याने मला फोन केला, असं वसंत मोरे यांनी स्पष्ट केलं आहे.

Cabinet meeting । ब्रेकिंग! पुणे जिल्ह्यातील ‘या’ तालुक्याचं नाव आता ‘राजगड’, मंत्रिमंडळ बैठकीतील सर्वात मोठा निर्णय

Ads

पुढे वसंत मोरे म्हणाले की, “भाजप हा मोठा पक्ष असून भाजप (BJP) माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्यांना का घेतील? मी माझा निर्णय घेतला असून मी त्या निर्णयाशी ठाम आहे. पुढचा निर्णय नक्की दोन दिवसांत घेईल”, असंही वसंत मोरे यांनी स्पष्ट केले आहे. वसंत मोरे आता कोणत्या पक्षात जातील? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Vijay Shivtare । मोठी बातमी! बारामतीत विजय शिवतारे देणार अजितदादांना आव्हान

Spread the love