Vasant More । महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीपूर्वी (Lok Sabha Elections) राज ठाकरे यांचा पक्ष मनसेला मोठा झटका बसला आहे. पक्षाच्या एका फायरब्रँड नेत्याने राजीनामा दिला आहे. वसंत मोरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून राजीनामा दिल्याची माहिती दिली. साहेब.. मला माफ करा’, असे अशी पोस्ट शेअर करत वसंत मोरे यांनी मनसे पक्षाला रामराम ठोकला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून राज ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. वसंत मोरे (Vasant More ) यांनी राजीनामा देताच लगेच त्यांना अजित पवार गटाकडून ऑफर आली आहे.
Ajit Pawar । “बारामती अडचणीत आणाल तर परिणाम कल्याणमध्ये होईल”, अजित पवार गटाचा शिंदे गटाला थेट इशारा
वसंत मोरे यांचे पहिलं अभिनंदन, त्यांनी घेतलेला निर्णय एकदम योग्य आहे. मी म्हणेल त्यांना हा निर्णय घ्यायला उशिर झाला. लोकांची पसंत मोरे वसंत पण मनसेला नव्हती पसंत म्हणून मला वाटतं त्यांनी घेतलेला निर्णय एकं योग्य आहे असं रूपाली पाटील म्हणाल्या आहेत. त्याचबरोबर वसंत भाऊ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने तुमचं स्वागतच असेल. हा निर्णय देखील तुम्हालाच घ्यायचा म्हणत रूपाली पाटील यांनी वसंत मोरे यांना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिली आहे.
IPL 2024 । आयपीएलमध्ये 16 वर्षांत पहिल्यांदाच असं काही घडलं की….
दरम्यान, याआधी रूपाली पाटील यादेखील मनसेमध्ये होत्या. यांनतर त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. आता रूपाली पाटील यांनी वसंत मोरे यांना देखील राष्ट्रवादी पक्षात येण्यासाठी ऑफर दिली आहे. त्यामुळे आता यावर वसंत मोरे काय निर्णय घेतायेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सर्वांच्या लक्ष त्यांच्या निर्णयाकडे लागले आहे.
Vasant More । मनसेची साथ सोडताना माध्यमांसमोर ढसाढसा रडले वसंत मोरे; नेमकं काय घडलं?