शेतकऱ्यांसाठी बेलवंडी फाटा येथे भाजीपाला संकलन केंद्र सुरु

Vegetable collection center started at Belwandi Phata for farmers

आमदार निलेश लंके (Nilesh Lanka) गोरगरिबांसाठी, शेतकऱ्यांसाठी कायम मदत करत असतात. आता देखील त्यांनी शेतकऱ्यांसाठी बेलवंडी फाटा (Belwandi Phata) येथे भाजीपाला संकलन केंद्र सुरु केले आहे.

Ajit Pawar: अजित पवारांनी बारामतीचा रेडा घेऊन गुवाहाटीला जावं – अब्दुल सत्तार

शिरूर (Shirur) बाजार समिती मध्ये दररोज सायंकाळी तरकारी मालाची खरेदी विक्री करण्यात येते. गेल्या पंधरा दिवसांपासून बाजार समिती प्रशासनाने ही खरेदी विक्री सायंकाळी न करता पहाटे चार वाजल्यापासून सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विशेषतः पारनेर व श्रीगोंदे तालुक्यातील शेतकऱ्यांपुढे मोठी समस्या निर्माण झाली होती. याच शेतकऱ्यांच्या समस्येचा विचार करून आमदार निलेश लंके यांनी बेलवंडी फाटा येथे भाजीपाला संकलन केंद्र सुरु केले आहे.

“शिवभक्तांच्या भावना सरकारला समजत नसतील तर उठाव होणारच”, संभाजीराजे भोसले कडाडले

दरम्यान, पारनेर व श्रीगोंदे तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय दिलाच पाहिजे अशी भूमिका आमदार निलेश लंके यांनी घेतली. यामुळे दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सोयीचे ठरेल असे बेलवंडी फाटा येथे तरकारी मार्केट सुरू करण्यात आले आहे. यावेळी आमदार निलेश लंके तसेच, श्रीगोंदा, शिरूर व पारनेर तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह असंख्य शेतकरी यावेळी उपस्थित होते.

गाई-म्हशीच्या दुधापेक्षा फायदेशीर ठरतंय शेळीचं दूध; ‘हे’ आहेत फायदे

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *