मुंबई : दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. आता ऐन सणासुदीच्या मुहूर्तावर भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. भाजीपाल्यांच्या (Vegetables) किंमतीमध्ये 20 ते 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला हे परवडणार नाही, भाजीपाल्याचे दर वाढल्याने गृहिणींचं बजेट देखील आणखी कोलमडणार आहे.
विद्यार्थिनीचा संघर्ष! फुटपाथवर दिव्याच्या प्रकाशात अभ्यास; पाहा व्हायरल VIDEO
मागच्या आठवड्यात राज्यात परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात झाला आहे. यामुळे काढणीला आलेल्या भाज्या अक्षरश पाण्यामध्ये सडून गेल्या आहेत. त्यामुळे भाजपल्याचे दर वाढले आहेत. भाजीपालाच्या दरात 20 ते 25 टक्क्यांची वाढ झाल्याची पाहायला मिळत आहे. भाजीपाल्याचे दर कमी होण्यासाठी एक महिना लागेल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. यामुळे तोपर्यंत सर्वसामान्यांना भाजीपाला जास्त दराने घ्यावा लागणार आहे.
Urfi Javed: उर्फी जावेदला पोलिसांचा दणका! पहा नेमकं काय आहे प्रकरण?
आपण जर भाज्यांच्या दराचा विचार केला तर, गवार १०० रु.किलो, फ्लावर ६० रु.किलो, कोथिंबीर 40 रुपये गड्डी, फुलकोबी ६० रु.किलो, पालक ६० रु.किलो, शेपू ५० रु.किलो सध्या भाजीपाल्याचे हे दर बाजारामध्ये आहेत.
शेतकऱ्यांसाठी दिलासादायक! ई-पीक पाहणीची अट झाली रद्द, आता थेट मिळणार शेतकऱ्यांना मदत