Video । भीषण अपघात, खेळता खेळता 3 वर्षाच्या मुलीवर काचेचा दरवाजा पडला, धक्कादायक व्हिडीओ आला समोर

Video

Video । पंजाबमधील लुधियाना येथून एक वेदनादायक व्हिडिओ (A painful video from Ludhiana, Punjab) समोर आला आहे. येथे एका कपड्यांच्या शोरूममध्ये तीन वर्षांची मुलगी तिच्या कुटुंबासह दिसली. तिथे ती काचेच्या दरवाजाशी खेळू लागली. त्यानंतर अचानक दरवाजा त्या मुलीच्या अंगावर पडला, त्यामुळे तिचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (Viral Video )

Heavy Rain । अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर दुःखाचा डोंगर, नुकसान भरपाई कशी होणार?

त्याचबरोबर हा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोकही त्यावर आपल्या तीव्र प्रतिक्रिया देत आहेत. हा भितीदायक व्हिडिओ पाहून सगळेच हैराण झाले आहेत. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, ती मुलगी शोरूममध्ये खेळत असताना दरवाजा तिच्या अंगावर पडला. या भीषण अपघातानंतर मुलीला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. (Social Media)

या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर गगनदीप सिंह नावाच्या युजरने शेअर केला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत असून. यावर नेटकरी वेगवगेळ्या प्रतिक्रिया देखील देत आहेत.

Spread the love