सैराट, फँड्री, नाळ आणि झुंडच्या यशानंतर प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व लेखक नागराज मंजुळे यांचा घर बंदूक बिर्याणी हा नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटात आकाश ठोसर, सयाजी शिंदे, सायली पाटील हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. येत्या 7 एप्रिलला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
दरम्यान, घर बंदूक बिरयानी’ चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरची सोशल मीडियावर तुफान चर्चा होताना दिसत आहे. चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर सोशल मीडियावर झळकला असून यामध्ये नागराज मंजुळे, सयाजी शिंदे, आकाश ठोसर आणि सायली पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
सगळं ठरलंय! लोकसभा 2024 च्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी सज्ज
या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पोलीस, डाकू यांच्यामध्ये चकमक झाल्याची पहायला मिळत आहे. त्यामुळे आता प्रेक्षक चित्रपट प्रदर्शित होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसान योजनेचा 14 वा हप्ता ‘या’ तारखेला होणार जमा