पंजाब : पंजाब (Punjab) राज्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पंजाबच्या चंदीगड विद्यापीठातील (Chandigarh University) एका विद्यार्थिनीने आंघोळ करताना इतर 60 विद्यार्थिनींचा व्हिडिओ (Video) बनवला. हा व्हिडिओ तिने तरुणांना पाठवला आणि तरुणांनी हा व्हिडिओ व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल केला. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर वसतिगृहातील (Girls Hostel) 8 विद्यार्थिनींनी आत्महत्येचा प्रयत्न केलाय. त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
शनिवारी दुपारी अडीच वाजता मोठा गोंधळ झाला. या घटनेनंतर संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी रात्री उशिरा विद्यापीठ परिसरात ठिय्या आंदोलन केले. 8 विद्यार्थिनींनी आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण दडपण्यासाठी व्यवस्थापन त्यांच्यावर दबाव आणत असल्याचे विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
Aryan Khan: आर्यन खानच्या प्रेमात पडली ‘ही’ पाकिस्तानी अभिनेत्री, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट
तरुणींचा व्हिडिओ इंटरनेट मीडियावर व्हायरल (viral) करणारा तरुण शिमलाचा रहिवासी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पोलिसांना या तरुणीला ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी आता पंजाब महिला आयोगाच्या अध्यक्षा मनीषा गुलाटी चंदीगड यांनी विद्यापिठात जाऊन चौकशी केली आहे.nतसेच याप्रकरणी आम्ही कठोर कारवाई करू असे शिक्षणमंत्री हरजोत बैंस यांनी सांगितलं.
केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेअंतर्गत मुलींना मिळणार ५१ हजार रुपये; असा करा अर्ज