Vietnam Fire । सध्या आग लागल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. व्हिएतनाममध्ये भयानक आग लागली आहे. व्हिएतनामची राजधानी हनोईमध्ये भयंकर दुर्घटना घडली आहे. ९ मजली इमारतीला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये ज 50 रहिवाशांचा होरपळून मृत्यू झाल्या मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. तेथील स्थानिक मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार ही घटना मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे.
Viral Video । धक्कादायक! विद्यार्थिनींनी फोडली थेट शिक्षण अधिकाऱ्यांची गाडी, काय आहे प्रकरण?
मीडिया रिपोर्टनुसार, मंगळवारी रात्रीच्या सुमारास ही भीषण आग लागली. रात्रीच्या सुमारास आग लागल्यामुळे जवळपास बरेच रहिवाशी घरी होते त्यामुळे या ठिकाणी अनेक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. माहितीनुसार आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या इमारतीमध्ये जवळपास 150 रहिवाशी होते. यामधील 50 रहिवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
Ajit Pawar । अजित पवार गटाला मोठा धक्का, ट्विटरकडून कारवाई
व्हिएतनामची राजधानी हनोईमध्ये ज्या इमारतीला आग लागली ती इमारत चांगल्या गजबजलेल्या ठिकाणी होते. त्यामुळे त्या ठिकाणी बचावकार्य करण्यास देखील अडथळा निर्माण होत होता. या घटनेची माहिती मिळताच तेथील स्थानिक यंत्रणांनी तातडीने बचाव कार्यास सुरुवात केली.
Aurangabad Crime । माजी उपसभापतीच्याच लॉजवर सुरु होता नको तो प्रकार, पोलिसांनी धाड टाकली आणि…
तेथील स्थानिक यंत्रणेला जवळपास 70 नागरिकांना वाचवण्यात यश आले आहे. त्याचबरोबर 54 नागरिक तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इमारतीला नेमकी आग कोणत्या कारणामुळे लागली याची अजून माहिती समोर आलेली नाही. मात्र याबाबतचा अधिकचा तपास आता पोलीस यंत्रणा करत आहे.
Gold Silver Price Today । ग्राहकांनो चला खरेदीला! ‘इतक्या’ स्वस्तात खरेदी करता येणार सोने-चांदी