मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) याचा लाइगर (Liger) चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून विजय देवरकोंडा बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटामध्ये विजय देवरकोंडासोबत अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Pandey) मुख्य भूमिकेत आहे. विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे यांचे चाहते लाइगर या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. आता हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे, त्यानंतर या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचा अहवाल समोर आला आहे.
लाइगर चित्रपटाने पहिल्याच धमाकेदार कमाई केली आहे. या चित्रपटाने अभिनेता आमिर खानचा चित्रपट लाल सिंह चड्ढा आणि अक्षय कुमारचा चित्रपट रक्षाबंधन यांनाही मागे टाकले आहे. ‘लाइगर’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी एकूण 27 कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट अनेक भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे त्यामध्ये तेलुगू भाषेत सर्वाधिक कमाई केली आहे.
Eknath Shinde: मराठा आरक्षणाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्याची नोकरीसंदर्भात महत्वाची घोषणा; म्हणाले…
सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, विजय देवरकोंडाच्या या चित्रपटाने केवळ तेलुगूमध्ये 24.5 कोटींची कमाई केली. अशा परिस्थितीत विजय देवरकोंडाच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केली आहे. ‘लाइगर’ चित्रपटातून विजय देवरकोंडा बॉक्सरची भूमिका साकारत आहे.