Vijay Kadam Passed Away । चित्रपटसृष्टीवर शोककळा! अभिनेते विजय कदम यांचं निधन

Vijay Kadam Passed Away

Vijay Kadam Passed Away । मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज पहाटे निधन झाले. विजय कदम 1980 आणि 90 च्या दशकात प्रचंड लोकप्रिय होते. ते त्यांच्या अष्टपैलू अभिनय क्षमतेसाठी ओळखले जात असे, त्यांनी गंभीर भूमिकांप्रमाणेच विनोदी भूमिकाही केल्या आहेत. गेली दीड वर्षे ते कर्करोगाचा सामना करत होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.

Brazil Plane Crash । विमानाचा मोठा अपघात, 62 प्रवाशांना घेऊन उड्डाण करणारे विमान अचानक जमिनीवर पडले, भयानक व्हिडिओ समोर

गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, आज सकाळी जीवनाची लढाई हरून त्यांनी या जगाचा निरोप घेतला. कॅन्सरसारख्या आजाराने अभिनेत्याचा जीव घेतला. अभिनेते विजय कदम यांच्या पार्थिवावर आज रात्री उशिरा अंधेरी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या दु:खद बातमीनंतर मराठी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.

Politics News । महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ, बड्या नेत्याचे शरद पवारानांवर धक्कादायक आरोप!

माहितीनुसार, अभिनेत्याच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे. या अभिनेत्याने आज सकाळी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.

Redmi Note 14 Pro स्मार्टफोन लवकरच होणार लॉन्च; ‘हे’ असतील फीचर्स

Spread the love