Vijay Shivatare । बारामतीत मोठ्या घडामोडी, विजय शिवतारे यांचं सर्वात मोठं विधान

Vijay Shivtare

Vijay Shivatare । लोकसभा निवडणुकीत सर्वांचे लक्ष बारामती मतदारसंघांमध्ये लागले आहे, बारामती मतदारसंघात सध्या मोठ्या हालचाली घडताना दिसत आहेत. शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे तर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार देखील बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. या सर्व घडामोडी घडत असतानाच शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी आपण बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. मात्र आता यामध्ये मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. महायुतीकडून महादेव जानकर यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे. आता यावर विजय शिवतारे यांनी आपली सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.

Baramati Lok Sabha । अजितदादांची धक्कादायक बातमी; शिंदे गटानेही दर्शवला बारामतीत विरोध

याबाबत बोलताना विजय शिवतारे म्हणाले, “लोकशाहीमध्ये लढण्याचा सर्वांना अधिकार आहे. जानकर 2024 साली लढले होते. मात्र मला एवढं समजलं नाही की एका बाजूने सुनेत्रा पवार यांचा प्रचार सुरू होता. तर अचानक महादेव जानकर नाव का येत आहे. मात्र ठीक आहे शेवटी कोण ना कोण लढणार आहे. असे ते म्हणाले आहेत.

Sanjay Raut । बिग ब्रेकिंग! प्रकाश आंबेडकरांसोबत युती संपुष्टात? संजय राऊतांच्या ‘त्या’ विधानाने खळबळ

त्याचबरोबर पुढे बोलताना ते, म्हणाले महादेव जानकर सोडा अजून कोणाला जरी ते घेऊन आले तरी मी लढणारच आहे. जनता पाठीशी असल्यावर घाबरायचं कशाला जे होईल ते होईल असं ठाम मत विजय शिवतारे यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे आगामी काळात महायुतीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

Praniti Shinde | राजकारणातून सर्वात मोठी बातमी! प्रणिती शिंदेंचं थेट राम सातपुतेंना पत्र

Spread the love