Vijay Shivtare | ब्रेकिंग! विजय शिवतारेंनी केली सर्वात मोठी घोषणा

Vijay Shivtare

Vijay Shivtare | लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. काही ठिकाणी उमेदवारांची घोषणा झाली आहे तर काही ठिकाणी अजूनही उमेदवारांची घोषणा झाली नाही. सध्या बारामती मतदार संघ हा चांगलाच चर्चेत आला आहे. बारामतीत यंदाची निवडणूक खूप अटीतटीची असणार आहे. बारामती मतदारसंघाकडे (Baramati Constituency) संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. (Latest Marathi News)

Topers Ad

Bacchu Kadu । ब्रेकिंग! बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडणार? महायुतीला मोठा धक्का बसण्याची शक्यता

बारामतीमध्ये शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंविरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार लढणार आहेत. त्याचबरोबर यामधील नवीन ट्विस्ट म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी देखील बारामती मतदासंघातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचा दावा केला आहे. यामुळे महायुतीत मोठा तिढा निर्माण झाला आहे.

Prasad Pujari । ब्रेकिंग! 20 वर्षांपासून फरार असलेल्या गुंड प्रसादच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

एकीकडे बारामती मतदार संघातून शिवतारे यांना निवडणूक लढवायची आहे तर दुसरीकडे सुनेत्रा पवार यांची उमेदवारी निश्चित आहे. त्यामुळे बारामतीच्या जागेवरुन नेमका काय निर्णय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान विजय शिवतारे याना शिवसेनेमधून बाहेर पडणार काय?, असा सवाल करण्यात आला असता शिवतारे यांनी दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे.

Ajit Pawar । निवडणुकीच्या तोंडावर अजितदादांना मोठी डोकेदुखी; ‘या’ बड्या नेत्याने वाढवलं टेन्शन

काय म्हणाले शिवतारे?

शिवसेनेतून बाहेर पडणार का असा प्रश्न पत्रकारांनी विजय शिवतारे यांना विचारला. यावेळी बोलताना विजय शिवतारे म्हणाले, एकनाथ शिंदे आणि माझे घनिष्ठ नाते आहे. दोन-चार महिने त्यांची अडचण झाली आहे. मला लोकसभा निवडणूक लढवायची आहे. मात्र महायुतीमध्ये आपल्याला जागा तर सुटणार नाही. त्यांना अडचण आहे म्हणून मी बाहेर पडतोय. मात्र 25 वर्षाची सोबत आहे आणि ती कायम असणार आहे. मी लोकसभेत विजय होणार असं विजय शिवतारे म्हणाले आहेत.

Bjp । निवडणुकीपूर्वी भाजपला सर्वात मोठा धक्का! ‘या’ पक्षाने केली स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा

Spread the love