Vijay Shivtare । विजय शिवतारे यांनी सांगितलं माघार घेण्यामागचं मोठं कारण; म्हणाले…

Vijay Shivtare

Vijay Shivtare । बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Lok Sabha Constituency) यंदा चांगलेच राजकीय वातावरण तापले होते. बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) अशी रंगत होणार होती, पण त्यात शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी देखील निवडणुकीची घोषणा केली होती. पण आता विजय शिवतारे यांनी माघार घेतली आहे.

Maharashtra Politics । निवडणुकीपूर्वीच काँग्रेसच्या वाढल्या अडचणी! बड्या नेत्याने घेतला अपक्ष लढण्याचा निर्णय

शिवतारेंनी माघार घेण्यामागचं कारण सांगितलं आहे. बोलताना ते म्हणाले की, “मी इतके दिवस मुख्यमंत्र्यांचे ऐकत नव्हतो, त्यामुळे ते माझ्यावर रागावले होते. पण मला एक फोन आला, मुख्यमंत्री अडचणीत असून त्यांना आपल्याला सांभाळून घ्यावं लागणार आहे. 15 ते 20 लोकसभा उमेदवार पडू शकतात. नरेंद्र मोदींना (Narendra Modi) पंतप्रधान करण्याचं स्वप्न पूर्ण करायचं असल्याने मी माघार घेतली,” असे शिवतारे यांनी स्पष्ट केले.

Nawab Malik । बिग ब्रेकिंग! नवाब मलिक यांची प्रकृती बिघडली, तातडीने केले रुग्णालयात दाखल

“माझं आयुष्य किती आहे हे मला माहित नाही. कारण सध्या मी अनेक आजारांनी त्रस्त आहे. त्यामुळे मी जनतेचं हित जोपासायचं ठरवलं. निवडणूक न लढता आपल्या मागण्या मान्य होत असून पुरंदर तालुक्यातील दीड लाखांचं लीड महायुतीला द्यायचं, आमचं ठरलं आहे. जरी अजित पवारांकडून काही चुका झाल्या असतील, पण मोदींचे हात बळकट करण्यासाठी हा निर्णय घेतला,” असेही शिवतारे म्हणाले आहेत.

Maharashtra Politics । काँग्रेसला भलंमोठं खिंडार! लोकसभेच्या तोंडावर माजी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या सूनेने केला भाजपमध्ये प्रवेश

Spread the love