
Vijay Vadettiwar । या वर्षीच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी (Lok Sabha and Assembly Elections) महाराष्ट्रातील संकटात सापडलेल्या काँग्रेसला मोठा धक्का बसला असून, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. माजी लोकसभा खासदार मिलिंद देवरा (Milind Deora) आणि वांद्रेचे माजी आमदार बाबा सिद्दीकी (Baba Siddiqui) यांच्यानंतर चव्हाण यांचे जाणे हे सलग तिसरे जाणे आहे, पण अनुभवी म्हणून त्यांची विश्वासार्हता पाहता हा काँग्रेसला मोठा धक्का आहे.
Ajit Pawar । अशोक चव्हाणांचा राजीनामा अजित पवारांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “काहीतरी गडबड..”
काँग्रेसला अनेक मोठे धक्क्यावर धक्के बसत आहेत. यामध्येच आता आमदार रवी राणा यांनी एक मोठा दावा केला आहे. त्यामुळे काँग्रेसची डोकेदुखी आणखी वाढली आहे. अशोक चव्हाण यांच्यासोबत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे सुद्धा येणार आहेत. विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेता असले तरी त्यांचं काय सुरू आहे ते मला माहीत आहे, असा मोठा दावा रवी राणा यांनी केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
Ashok Chavan । अशोक चव्हाण आजच करणार भाजपमध्ये प्रवेश
मागच्या अनेक दिवसापासून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपच्या संपर्कात होते. अशोक चव्हाण यांच्यासोबत अनेक काँग्रेसचे आमदार संपर्कात आहेत. आगामी काळात एक मोठा स्फोट काँग्रेसमध्ये होईल, असा मोठा दावा आमदार रवी राणा यांनी केला आहे. यामुळे चर्चांना उधाण आले आहे. रवी राणा यांनी केलेले सर्व आरोप विजय वडेट्टीवार यांनी खोडून काढले आहेत. आपण काँग्रेस सोडून कुठे ही जाणार नसल्याचे विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं आहे.