Vinayak Mete : विनायक मेटे यांचं निधन मनाला वेदना देणारं, उद्धव ठाकरे भावूक

Vinayak Mete's death is heartbreaking, Uddhav Thackeray is emotional

मुंबई : शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या गाडीचा मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील माडप बोगद्याजवळ अपघात होऊन त्यांचं निधन झाले आहे. अपघातामध्ये विनायक मेटे गंभीर जखमी झाले होते त्यामुळे त्यांना कामोठेतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण रुग्णालयात दाखल करताच त्यांना मृत घोषित करण्यात आले. यावर उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) देखील शोक व्यक्त केला आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, विनायकराव मेटे यांना गेल्याअनेक वर्षांपासून जवळून पाहण्याचा योग आला, त्यांनी कायम मराठा समाजासाठी संघर्ष केला. त्यांची तळमळ आणि शोषितांना न्याय देण्याचा आग्रह , धडपड पाहताना त्यांचे कौतुक वाटायचे. त्यांच्या निधनाने कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. या शब्दामध्ये उद्धव ठाकरे यांनी त्यांना विनायक मेटेंना श्रद्धांजली वाहिली.

दरम्यान,विनायक मेटेंचा सहकारी एकनाथ कदम (Eknath Kadam) यांनी माध्यमांशी बोलताना अपघात कसा झाला याची माहिती दिली. ते म्हणाले, “आम्ही बीडवरून मुंबईला येत होतो. आम्हाला एका मोठ्या ट्रकनं कट मारला. त्यामुळे ट्रकच्या बंपरमध्ये कार अडकली आणि काही अंतरापर्यंत फरफटत गेली. पण मदत पोहोचण्यासाठी एक तास लागला. मी फोन केला तेव्हा कंट्रोल रूमवरच्या कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर प्रतिसाद दिला नाही. जवळपास ६ वाजता रुग्णवाहिका आली”

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *