ऑनस्क्रीन डिंपल कपाडिया यांना Kiss करत होते विनोद खन्ना, पुढे असं घडली की…

Vinod Khanna was kissing Dimple Kapadia onscreen, then it happened that…

मुंबई : दिवंगत अभिनेते विनोद खन्ना (Actor Vinod Khanna) आज आपल्यात नक्कीच नाहीत, पण आजही प्रेक्षक त्यांना त्यांच्या दमदार अभिनयाने स्मरणात ठेवतात. विनोद खन्ना हे एकेकाळचे सुपरस्टार म्हणून ओळखले जातात.1968 मध्ये ‘मेरे अपने’ या चित्रपटातून आपल्या बॉलिवूड (bollywood) करिअरची सुरुवात केली. तसेच त्यांनी ‘अमर अकबर अँथनी’, ‘राजपूत’, ‘द बर्निंग ट्रेन’ आणि ‘कुर्बान’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. दरम्यान आज आपण महेश भट्ट (Mahesh bhatt) यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘प्रेम धर्म’ (Prem Dharm movie) चित्रपटाबाबत जाणून घेणार आहोत. या चित्रपटात विनोद खन्ना यांच्याबरोबर अभिनेत्री डिंपल कपाडिया (Actress Dimple Kapadia) यांना कास्ट करण्यात आलं होतं.

‘या’ योजेनंतर्गत गाय गोठा बांधण्यासाठी मिळणार ८० लाख रुपये अनुदान

खरतर विनोद खन्ना यांनी आध्यात्मिक गुरु ‘ओशो रजनीश’ यांच्या सेवेसाठी बॉलिवूडमधून ५ वर्षांचा ब्रेक घेतला होता. दरम्यान मोठ्या ब्रेकवरून परत आल्यानंतर विनोद खन्ना यांच्या हातात बरेच प्रोजेक्ट होते. त्यामुळे हातातून काम जाऊ नये म्हणून ते दोन शिफ्टमध्ये काम करू लागले होते. दरम्यान महेश भट्ट यांनी विनोद खन्ना यांच्याबरोबर रात्रीच्या शिफ्टमध्ये ‘प्रेम धर्म’चं शूटिंग करायचं ठरवलं. चित्रपटात एक इंटिमेट सीन होता. या सीनमध्ये विनोद खन्ना यांना झोपायला जाण्याआधी डिंपल कपाडिया यांना किस करून मिठीत घ्यायचं होतं.

Prathamesh Parab: ‘टाईमपास’ फेम दगडूला मिळाली खऱ्या आयुष्यातील प्राजू; पाहा PHOTO

दरम्यान या सीनच्या शुटिंगसाठी विनोद खन्ना सेटवर पोहोचले. त्यानंतर त्यांनी कॉस्ट्यूम बदलून डिंपल यांच्यासह बेडवर आपली पोझिशन घेतली. त्यानंतर महेश भट्ट यांनी अॅक्शन म्हणून शूटिंगला सुरुवात केली. यावेळी विनोद खन्ना यांनी अभिनेत्री डिंपल यांना अनेकदा किस केलं आणि मिठीत घेतलं. पण महेश भट्ट यांना हाच पण परफेक्ट सीन हवा होता. यासाठी त्यांनी एक लॉन्ग शॉट घेतला. दरम्यान यावेळी महेश भट्ट आणि त्यांची संपूर्ण टीम थोडी दूर थांबली होती. सीनच शूट सुरू झालं आणि विनोद खन्ना डिंपल यांना किस करू लागले आणि नंतर त्यांना मिठीत घेतलं.त्यानंतर सीन पूर्ण झाला म्हणून महेश भट्ट कट अस म्हटलं. पण त्यांचा आवाज विनोद खन्ना यांच्यापर्यंत पोहोचला नाही. ते डिंपल यांना किस करतच राहिले.

‘या’ योजेनंतर्गत गाय गोठा बांधण्यासाठी मिळणार ८० लाख रुपये अनुदान

त्यांच्या या कृतीने डिंपलही हैराण झाल्या होत्या. अखेर महेश भट्ट आणि टीम सीनच्या सेटवर पोहोचले. त्यानंतर ते जोरात ‘कट कट कट’ असं ओरडले. तेव्हा कुठे विनोद खन्ना भानावर आले आणि त्यांनी डिंपल यांना सोडलं. दरम्यान डिंपल कपाडिया यांना विनोद खन्ना यांच्या वागण्यानं खूप मोठा धक्का बसला होता. आणि त्या रडत रडत मेकअप रुममध्ये पोहोचल्या. दरम्यान महेश भट्ट यांनी या घटनेनंतर विनोद खन्ना यांना डिंपल कपाडिया यांची माफी मागायला लावली होती. त्यानंतर विनोद खन्ना यांनी देखील डिंपल कपाडिया यांची माफी मागितली. तसच सीनवेळी ते नशेत होते आणि स्वतःवरच नियंत्रण सुटल्याने असं घडल्याचं त्यांनी मान्य केलं.

‘या’ योजनेंतर्गत मुलीच्या लग्नासाठी मिळणार 27 लाख रुपये; वाचा सविस्तर

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *