Site icon e लोकहित | Marathi News

Vinod Tawde । मोठी बातमी! ज्या हॉटेलमध्ये विनोद तावडेंना पकडलं त्याच हॉटेलमध्ये ७ महिला सापडल्या; राजकारणात खळबळ

Vinod Tawade

Vinod Tawde । विरारमधील विवांत हॉटेलमध्ये भाजपचे केंद्रीय महासचिव विनोद तावडे यांच्या उपस्थितीत पैसे वाटल्याच्या आरोपावरून मोठा राजकीय वाद झाला आहे. बविआचे कार्यकर्ते आणि आमदार क्षितीज ठाकूर यांना माहिती मिळाली की, तावडे आणि भाजपचे काही नेते हॉटेलमध्ये पैसे वाटत आहेत. त्यानंतर बविआ कार्यकर्त्यांनी हॉटेलवर धाड टाकली आणि तिथे एक मोठा घेराव घातला.

Baramati News | बारामतीत पोलिसांची शोध मोहीम; युगेंद्र पवार यांच्या शोरुममध्ये तपासणी, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खळबळ

हॉटेलमध्ये घुसल्यावर, कार्यकर्त्यांनी तिथे काही लिफाफे आणि पैसे भरलेली बॅग सापडली. या पैशांचा वापर मतदानाच्या वेळी होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घडामोडींवरून निवडणूक प्रचाराच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप केला जात आहे. तावडे यांच्या रुममध्ये बविआ कार्यकर्त्यांनी झडती घेतली असता, सात महिलांची उपस्थिती सापडली, ज्यावरून खळबळ उडाली आहे. या महिलांनी सांगितले की, त्या एका ग्रुपने हॉटेलमध्ये आले होत्या आणि एका व्यक्तीसोबत आल्या होत्या.

Politics News । मतदानाच्या एक दिवस आधी उद्धव ठाकरे गटाला शिंदे गटाकडून मोठा धक्का!

आमदार हितेंद्र ठाकूर यांनी याबाबत खुलासा करत सांगितले की, त्यांना भाजपच्या एका नेत्याकडून पैसे वाटले जाण्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, त्यांनी कार्यकर्त्यांसह हॉटेल गाठले आणि तेथे काय चालले ते तपासले. हॉटेलमधून पैसे वगैरे सापडल्याने आणि महिलांची उपस्थिती पाहून त्यांना संशय निर्माण झाला. त्यानंतर पत्रकारांनी त्यांना विचारले असता, महिलांनी त्यांची ओळख न सांगता “आम्ही एका ग्रुपने आले आहोत” असे उत्तर दिले.

Sharad Pawar l रोहित पवारांना देणार मोठी जबाबदारी; शरद पवारांनी भरसभेत जाहीर केलं

Spread the love
Exit mobile version