Manipur Violence | मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार भडका! हल्ल्यात आतापर्यंत 160 जणांचा मृत्यू

Violence broke out again in Manipur! 160 people have died in the attack so far

Manipur Violence । 3 मेपासून भारताचे ईशान्येकडील मणिपूर (Manipur) राज्य अजूनही धगधगत आहे. मेईतेई (Meitei) आणि कुकी (Kuki) समाजातील वाद दिवसेंदिवस पेटत चालला आहे. परंतु, या दोन समाजाच्या वादात निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे हजारो लोक आपली घरे सोडून मदत छावण्यांमध्ये स्थलांतर करत आहेत. राज्यात शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी सरकारचे (Manipur Government) प्रयत्न सुरू आहेत. परंतु येथील हिंसाचाराच्या घटना थांबायचे नाव घेत नाहीत.

NCP Crisis । पुन्हा राजकीय भूकंप, राष्ट्रवादीचा आणखी एक गट फुटण्याच्या तयारीत; जयंत पाटलांच्या नावाची चर्चा

अशातच आता मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार पेटल्याचे पाहायला मिळत आहे. काल रात्री उशिरापर्यंत राज्यातील अनेक भागांमध्ये गोळीबार सुरू होता. मेईतेई समाजातील तीन लोकांची त्यांच्या घरात हत्या करून त्यांच्या मृतदेहाची नासाडी केली. धक्कादायक म्हणजे अवघ्या काही तासातच कुकी समाजातील दोन लोकांची हत्या केली. सध्या प्रकरणाचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.

Cabinet Expansion । अखेर मुहूर्त मिळाला! पुढच्या आठवड्यात होणार मंत्रिमंडळाचा विस्तार?

या हल्ल्यात आतापर्यंत 160 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आक्रमक जमावाने पोलिस ठाण्यावर हल्ला करत 235 रायफल, 21 पिस्तूल आणि 9 हजार गोळ्यांसह शस्त्रसाठा लुटला आहे. तसेच हिंसाचारात राज्यातील काही मंत्र्यांची घरे जाळली आहेत. त्यामुळे राज्यात अजूनही भीतीचे वातावरण आहे.

Amit Shah Pune Visit । अमित शहांचा आज पुणे दौरा, ‘हे’ रस्ते असतील बंद

Spread the love