Indonesia: इंडोनेशियात फुटबॉल सामन्यादरम्यान हिंसाचार, 127 जणांचा मृत्यू तर 180 पेक्षा जास्त लोक जखमी

Violence during football match in Indonesia, 127 dead and more than 180 injured

इंडोनेशियाच्या (Indonesia) मलंग रीजेंसीच्या कंजुरुहान स्टेडियममधून (stadium) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. फुटबॉल सामन्यादरम्यान स्टेडियमवर हिंसाचार घडला आहे. दरम्यान या हिंसाचारात 127 जणांचा मृत्यू (127 people died) झाला आहे. तर 180 पेक्षा जास्त लोक गंभीर जखमी (seriously injured) झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत पोलिसांनी (police) माहिती दिली आहे.

‘या’ कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल मिरचीला चार ते पाच हजारांचा दर

नेमक प्रकरण काय आहे?

इंडोनेशियाच्या मलंग रीजेंसीच्या कंजुरुहान स्टेडियमवर अरेमा एफसी आणि पर्सेबाया सुराबाय यांच्यादरम्यान सामना रंगला होता .दरम्यान या सामन्यात पर्सेबाया सुराबाय संघाने अरेमा एफसीवर मात करत 3-2 ने सामना जिंकला. दरम्यान या सामन्यानंतर पराभूत झालेल्या अरेमा एफसी संघाच्या नाराज चाहत्यांनी मैदानावर येत गोंधळ घातला. त्यामुळे मैदानातील चाहत्यांमध्ये धावपळ उडाली.

मत्स्यपालनाचा व्यवसाय सुरू करायचाय? मिळतेय बंपर सबसिडी आणि कमवा बक्कळ पैसा

या धावपळीनंतर चेंगराचेंगरीच्या घटना घडल्या. या दुर्घटनेत 127 जणांच्या मृत्यू झाला. तर, अनेक गंभीररित्या जखमी झाले आहे. यावेळी नाराज चाहत्यांना हुसकवण्यासाठी पोलिसांनी आश्रू धुराच्या कांड्याचा मारा केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर इंडोनेशिया बीआरआई लीगचे सर्व सामने एक आठवड्यासाठी स्थगित करण्यात आले आहेत.

आजपासून सरकारी कार्यालयात फोनवर बोलताना ‘हॅलो’ऐवजी ‘वंदे मातरम्’ म्हणावं लागणार; शासननिर्णय जारी

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *