
Viral CCTV Footage । सध्या एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरात पाण्याची मोटार चोरल्याच्या संशयावरून काही स्थानिकांनी दोघांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. यामुळे तेथील परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
Ritesh Deshmukh । … अन् रितेश देशमुखला मंचावर अश्रू अनावर, नेमकं कारण काय?
एका पोलीस अधिकाऱ्याने शनिवारी ही माहिती दिली. तपासादरम्यान दोघांना ताब्यात घेण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की, शुक्रवारी सकाळी रस्त्याने जाणाऱ्यांनी दुर्गादेवी पाड्यात सुरज परमार (25) आणि सूरज कोरी (22) यांचे मृतदेह पडल्याची माहिती पोलिसांना दिली.
- घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल
पोलीस अधिकारी म्हणाले, “घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोघेही पाण्याची मोटर चोरून पळून जाताना दिसत आहेत आणि कुत्रे त्यांच्यावर भुंकत आहेत. या आवाजामुळे काही लोक जागे झाले. त्यांनी दोघांचा पाठलाग करून त्यांना मारहाण केली, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.” ते म्हणाले की, पोस्टमॉर्टम अहवालात दोघांचाही अंतर्गत जखमांमुळे रक्तस्राव झाल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.