Viral News । मुलं मनाने खरी असतात, कधी-कधी अज्ञानामुळे अशा गोष्टी करतात. ज्याची आपल्यापैकी कोणीही कल्पना केली नसेल. अनेक वेळा छोट्या-छोट्या गोष्टींमुळे मुलांचा जीवही जाऊ शकतो. अशाच एका प्रकरणाची सध्याचर्चा होत आहे. एका १४ वर्षाच्या मुलाला अन्न गिळताना खूप त्रास होत होता, मात्र याबाबत डॉक्टरांकडे जाताच त्यानंतर जे दृश्य उलगडले ते पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले.
Crime News । सोशल मीडियावरची मैत्री पडली महागात! हॉटेलमध्ये नेत तरुणीवर….
डेली स्टार आणि न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन या इंग्रजी वेबसाइटमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, कॅलिफोर्नियातील एका 14 वर्षीय मुलाने मौजमजेसाठी एक नाणे गिळले. या प्रकरणात आश्चर्याची बाब म्हणजे हे नाणे अन्ननलिकेत अडकले नसून व्होकल कॉर्डमध्ये अडकले आहेत. ज्यावेळी आपण काही खातो तेव्हा ते अन्ननलिकेतून आपल्या पोटात जातं. पण या मुलाच्या बाबतीत तसं झालं नाही. उलट ते व्होकल कॉर्डमध्ये गेलं.
डॉक्टरांनाही आश्चर्य वाटले
अहवालानुसार, या मुलाच्या बाबतीत असे घडले की नाणे कॉर्डमध्ये अडकले होते जसे की कॉर्ड ही नाण्यासाठीच स्लॉट आहे. जेव्हा तो हॉस्पिटलमध्ये पोहोचला तेव्हा त्याने सांगितले की त्याला गिळण्यास त्रास होत आहे आणि काहीही गिळता येत नाही. डॉक्टरांनी ते स्कॅन केले तेव्हा त्यांना हे नाणे व्होकल कॉर्डमध्ये अतिशय गुंतागुंतीच्या ठिकाणी अडकल्याचे दिसून आले. मुलाची ही अवस्था पाहून डॉक्टरांनाही धक्का बसला.